औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद ‘सकल मराठा सोयरीक ग्रुप व सकल मराठा समाज यांच्या वतीने मराठा वधू- वर थेट भेट परिचय महामेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा १६ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते तीन या वेळेत प्रसाद लॉन्स बीड बायपास रोड, बाळापूर फाटा येथे होणार असल्याची माहिती ग्रुपचे ज्येष्ठ मार्गदर्शक व उद्योजक भाऊसाहेब ऊर्फ बापू काळे पाटील यांनी दिली.याबाबत ते म्हणाले की, विविध प्रांतांमध्ये पसरलेला सकल मराठा समाजाला आपल्या ग्रुपवर वधू वरांच्या सोयरिकीच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सकल मराठा समाजाचे संघटन एकत्रित करण्याचे कार्य सकल मराठा सोयरीक ग्रुपच्या माध्यमातून होत आहे. राज्यभरात ३३० तालुक्यात फक्त व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात सध्या काम सुरू आहे. सकल मराठा सोयरिक ग्रुप वधू-वर थेट भेट परिचय मेळाव्यात आत्तापर्यंत राज्यभरात सात हजारांपेक्षा अधिक विवाह जुळून आले आहेत. राज्या बाहेर सुद्धा कार्य सुरू आहे. सध्या समाजामध्ये काही विवाहसंबंध जुळून आणणारे दलाल, संस्थांना या सर्वांना आळा बसविण्यासाठी हा प्रयत्न सोयरीक पुपच्या माध्यमातून सुख आहे. सकल मराठा समाजातील विवाह इन्छुक वधू- वर व त्यांच्या पालकांनी आपल्या मुला-मुलीची मोफत राज्यस्तरीय मराठा वधू-वर परिचय मेळाव्यात नावनोंदणी करावी. या मेळाव्यात नगर, नाशिक, जळगाव, धुळे जालना, बीड, उस्मानाबाद आदी घेत आहेत. तालुक्यातुन व जिल्ह्यातील विवाह इच्छुक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या मेळाव्याचे उद्घाटन माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या हस्ते होणार आहे. वधू-वरांनी स्वतःचे फोटो, बायोडाटासह उपस्थित राहावे. असे आवाहन सकल मराठा सोयरीक ग्रूपच्या जिल्हाध्यक्षा डॉ. योगिता होके यांनी केले आहे. मेळाव्यासाठी ग्रुपचे कृष्णा लोखंडे, अनिल गडाख, प्रा. रामचंद्र राऊत, हरिभाऊ जगताप, बाळासाहेब वाकचौरे, माया जगताप, कृष्णा पाटील घोडके, शिवाजी निकम, सुभाष चोरात, धनंजय सांबारे, अच्युत गाडे, शिवव्याख्याते डी.बी. घुमरे, राजेश सरमाने, लक्ष्मणराव मडके, रघुनाथ झावरे, विनोद वाडेकर, सुदाम शिंदे, डॉ. आनंद वाघ, बाळासाहेब भोर आदी परिश्रम घेत आहे.