देवेंद्र सिरसाट.नागपूर.बहुजन समाज पार्टी हिंगणा विधानसभेच्या वतीने 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि बामसेफ, डी.एस.फोर., बुद्धिस्ट रीसर्च सेंटर, ब.स.पा.चे संस्थापक मान्यवर कांशीराम यांच्या 16 व्या परीनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर नगर वाडी येथे अभिवादन समारोह आयोजित करण्यात आला होता, समारोहाचे अध्यक्ष संदीप मेश्राम अध्यक्ष नागपूर जिल्हा, समारोहाचे उदघाटक अमित सिंग उपाध्यक्ष नागपूर जिल्हा, मंचावर प्रमुख उपस्थित महेश वासनिक अध्यक्ष हिंगणा विधानसभा, राजकुमार बोरकर, सुरेश मानवटकर, सतिश शेळके, रोशन शेंडे, सुधाकर सोनपिंपळे, महेंद्र लोखंडे, पूष्पांजली भगत, नरेंद्र मेंढे, प्रविणा शेळके उपसरपंच सातगाव, अस्मिता टेंभूर्णे उपस्थित होते, मंचासीन वक्त्यांनी महापूरुषांच्या चळवळीचे मुख्य धोरण सत्ता प्राप्त करा व बौध्दमय भारत हे स्वपन सत्यात उतरविण्यासाठी निरंतर संघर्ष करुन बहुजनांचे संविधानीक हक्क व अधिकार प्राप्त करण्यासाठी वाडी नगर परिषदेत बसपाचे बहुसंख्य नगरसेवक निवडून आणने व नगराध्यक्ष बनवणे हेच खरे कांशीराम यांना अभिवादन होईल असे मनोगत व्यक्त केले.प्रसंगी हिंगणा विधानसभेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर निकोसे, कोषाध्यक्ष आदेश लोखंडे, सचिव गोपाल मेश्राम, कैलाश मसराम, प्रेमलाल कुंवर, गजानन बिरेली, सुभाष सुखदेवे, संतोष शेंद्रे, प्रशांत दिवे, यासह हिंगणा, बुट्टिबोरी, कान्होलीबारा, गोधणी, वाडी, कळमेश्वर, सावनेर येथील बहुसंख्य बसपाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी विदर्भातील नामवंत प्रबोधनकार उमेश बागडे यांच्या संपूर्ण संचाने विविध संगीतमय गीतांनी महापूरुषांना अभिवादन करण्यात आले या समारोहाचे संचालन सुधाकर सोनपिंपळे, प्रस्ताविक महेश वासनिक, आभार वाडी शहर अध्यक्ष गौतम मेश्राम यांनी केले.