सावळदबारा येथे ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहात साजरा

Khozmaster
1 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे मोहम्मद पैगंबर याचां जन्मदिवस मोठ्या थाटामाटात गावातून रेली काढून साजरा करण्यात आला.इस्लाम धर्मात पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवसाला मोठे महत्त्व आहे. पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन म्हणून ईद ए मिलादुन्नबी म्हणून साजरा करण्यात येतो. ईद मिलाद ए दुनबी या दिवशी घरे व धार्मिक ठिकाणे रोषणाईने सजवली जातात प्रार्थना केली जाते. गरिबांना अन्नदान केले जातात इस्लामिक कॅलेंडरनुसार ईद-ए-मिलाद सन तिसऱ्या महिन्यात साजरा केला जातो. हा सण भारतासह जगातल्या विविध देशांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला. जातो ठिकठिकाणी जुलूस मिरवणुका काढण्यात येतात कोरोना काळाच्या दोन वर्षानंतर सण,उत्सव बंदच होते परंतु यंदा निर्बंध मुक्त वातावरणात सावळदबारा येथे जुलूस मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सावळदबारा येथील उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान,व मो.रफीक मो.शब्बीर यांच्या घरापासून मिरवणुकीला ढोल तासाच्या गजरात सुरुवात करण्यात आली. मिरवणूक अहिल्या माता चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक जाईचा देव मंदिरासमोरून शाली वस्ताद बाबा येथे मिरवणुकीला जुलूस संपन्न झाला. जुलूस मध्ये गावातील हिंदू, मुस्लिम मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशी माहिती मो.रफीक मो.शब्बीर(कादरिया ट्रेडर्श)भुसार मालाचे व्यापारी सावळदबारा ता.सोयगाव यांनी बोलताना सांगितले.

0 9 4 6 4 0
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *