सोयगाव सायबर फसवणुकी पासून सावधान सहायक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांचे आवाहन

Khozmaster
1 Min Read

सोयगाव प्रतिनिधी:गोकुळसिंग राजपूत सोयगाव शहरात व सोयगाव तालुक्यात सध्या सायबर फसवणुकीचा एक नवीन प्रकार निदर्शनास येत आहे. त्या नुसार सायबर गुन्ह्यागाराकडून नागरिकांना फोन करून तुमच्या फोनवर नवीन लॉन्च झालेली ५जी सेवा ऍक्टिव्हेट करायचे आहे असे सांगितले जाते. व त्यासाठी आम्ही दिलेली लिंक वर क्लिक करण्यास सांगून नागरिकांना एक लिंक पाठवण्यात येते.सदरच्या लिंक वर क्लिक केल्यावर नागरिकांचा वैयक्तिक डिटेल्स ची माहिती उदाहरण अर्थ बँक अकाउंट डिटेल्स इत्यादी किंवा पर्सनल डाटा सायबर गुन्हेगारांना मिळतो कुन्हेगाराकडून अन्यत्र कळविण्यात येते व त्यातून मोठया प्रमाणात फसवणूक होते असल्याची बाब निदर्शनास येतआहे. त्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारच्या कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नका.नागरिकांनी सर्तक राहाणे अशाप्रकारे प्राप्त झालेल्या कॉल व कोणत्याही रिप्लाय देऊ नका, या या माध्यमातून प्राप्त झालेले कोणतेही लिंक ओपन करू नका. पोलीस स्टेशन सोयगाव असे आवाहन करत आहे की असे काही प्रकार निदर्शनास आले की तात्काळ सोयगाव पोलीस स्टेशनला भेट द्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार साहेब यांनी असे आवाहन केले आहे.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *