तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पहूरचे फुले विद्यालय उपविजेते

Khozmaster
1 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जामनेर तालुक्यातील पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले .         केकतनिंभोरा येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे आश्रम शाळेत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा झाल्या . १७ वर्ष वयोगटा खालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या संघाने तोंडापूर येथील संघाशी तुल्यबळ लढत दिली . या संघाचे नेतृत्व पूर्वा सोनवणे हिने केले . यात निकीता घोंगडे , आकांक्षा जाधव , कोमल तडवी , जयश्री घोंगडे , आदिती घोंगडे , वैष्णवी गोल्हारे , वृषाली काळे , कल्याणी जाधव , कांचन घोंगडे , जयश्री जाधव या खेळाडूंचा सहभाग होता .शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख हरिभाऊ राऊत , चंदेश सागर यांचे मार्गदर्शन लाभले . यावेळी शिक्षक शंकर भामेरे , सुनिल पवार यांची उपस्थिती होती .        या उज्वल यशाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे , शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही . व्ही . घोंगडे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले .

0 9 4 6 3 7
Users Today : 51
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *