मशाल..

Khozmaster
1 Min Read

जाज्वल्यता प्रतिक

धगधगणारी मशाल

संघर्षाची शान बान

इतिहास तो विशाल 

 

उमेदीच्या निखा-या

रे लालशक्ती बहाल

जळून झालेले राख

उन्मत्त मत्त ते महाल

 

एक ठिणगी पुरेशी

अंतरी उजळून जाल

मशाल उर्जा प्रदायी

नसतो केवळ जाळ

 

क्रांतीची आदिजननी

धगधगते सालोसाल

अविरत राहे जागवत

आज उद्या अन् काल

 

काळरात्र सरुन जाय

उदया नवा उषःकाल

राक्षसी वृत्ती विरुद्ध 

ती बनूनि येईल काल

 

– हेमंत मुसरीफ पुणे 

  9730306996.

  www.kavyakusum.com

 

0 9 4 2 4 9
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *