सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील डोंगरकडा परिसरात नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन मुग, उडीद, तिळ या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले तर केळी, ऊस, हळद पिकासाठी मात्र झालेला पाऊस संजीवनी ठरला आहे. डोंगरकडा सावळदबारा, देव्हारी, टिटवी, पळसखेडा,गलवाडा,पिंपळवाडी,मोलखेडा, व फर्दापूर या भागात उतरा आणि हस्त या नक्षत्रात मुसळधार पावसामुळे शेतकन्यांच्या हाता तोंडाशी आलेला. सोयाबीन, मुग, उडीद, तिळ या पिकांचे अतोनात . मुग नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी सोयाबीन कापणी करून गंज्या लाऊन ठेवल्या पण अचानक मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पावसामुळे अक्षरश: मोड, कोम फुटले असल्याचे दिसून आले. नुकतेच उतरा हे नक्षत्र संपले आणि हस्त नक्षत्र सुरु झाल्याने परतीच्या अचानक पाऊस आल्याने शेतकन्यांची तारांबळ उडाली जो तो आपल्या सोयाबीन्ला पावसाच्या पाण्या वाचवण्यासाठी आधीच खर्च करून दुकानावरून ताडपत्र्या खरेदी करतांना दिसून येत होता मुग, उडीद गेले सोयाबीनला मोड फुटले या वर्षी झालेल्या पावसाळ्यात शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत मुग, उडीद, तिळ, ह्या ध्याण्याची पेरणी केली होती. ती अतिशय चांगल्या प्रकारे आली सुद्धा पण अवकाळी पावसामुळे त्यातल्या त्यात उतरा आणि हस्त या नक्षत्रातील अती मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा चांगलीच दमछाक झाली. यात कित्येक शेकल्यांचे तर हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला त्यामुळे बळीराजा पार कोलमडून गेला आहे.