सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील फर्दापुर येथील शेख मुक्तार शेख मुन्शी यांची दि:-११/१०/२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालयातील प्रांगणात गावातील लोकप्रतिनिधी नागरिक यांनी तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी पुन्हा फेरनिवड शेख मुक्तार यांच्याच नावाला सर्वाधिक पसंती दिली.जिल्हा मध्यवर्ती बँकमध्ये पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी शाखा व्यवस्थापक भगूरे,कॅशियर प्रकाश पाटील,साईदास पवार, शिवसेना युवा अध्यक्ष,इम्रान शहा,अजहर शेख, सय्यद शकील,पत्रकार प्रविण तायडे,उपस्थित होते.2018 मध्ये शेख मुक्तार त्यांच्या गळयात सर्वप्रथम तंटामुक्ती अध्यक्षपदाची माळ पडली 2018 -2022 पर्यन्त गोर,गरीब जनतेचे प्रश्न,असो समस्या असो पोलिस स्टेशन पर्यंत प्रकरण न जाऊ देता समज देऊन व मार्ग काढून प्रकरणे मार्गी लावले रात्री अपरात्री ते प्रकरणे मार्गी लावण्यासाठी सदैव तत्परता दाखवली सर्व धर्म समभाव, व एक घट्ट नाळ रुजवून लोकांच्या मनात एक आपुलकीचे नाते रुजवले त्याचेच फळ म्हणून परत फेर निवड म्हणून शेख मुक्तार शेख मुन्शी यांची तंटामुक्ती च्या अध्यक्ष पदी पुन्हा फेरनिवड करण्यात आली त्यांच्या फेरनियुक्तीचे गावातील सर्वच नागरिकांनी अभिनंदन केले.