सोयगाव तालुक्यात नाविण्यपूर्ण पिक म्हणून करडई व जवस प्रात्यक्षिक प्रयोग

Khozmaster
3 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव परिसरात सध्या रब्बी कोरडवाहू पिक पेरणीसाठी महत्वाचा असा कालावधी आहे कोरडवाहू शेतीसाठी उपलब्ध ओलाव्यावर पेरणी करत उगवण व्हावी असा दृष्टीकोन शेतकरी बांधवांचा असतो त्यामुळे वेळेवर पेरणी करणे सर्वात महत्वाचे असते पूर्वी प्रमाणे केवळ रब्बीसाठी कोरे क्षेत्र आता ठेवणे शक्य नाही त्यामुळे खरीप मूग, उडीद , सोयाबीन, बाजरी , मका आदी पिक काढणीनंतर रब्बी पिक पेरणी करायाची झाल्यास उपलब्ध ओलावा जपत पेरणी केली तर पिकाची उगवणशक्ती चांगली होते यासाठी खरीपाची पिके निघताच अगोदर तण काढणे महत्वाचे ठरते यासाठी फार खोलावर मशागत न करता तणे काढली तर जमिनीत असलेला ओलावा अबाधित राहतो याचा उपयोग रब्बी पिके येण्यासाठी होतो.कोरडवाहू रब्बी पिकाची १५ऑक्टोबर पर्यंत पेरणी व्हावी जेणे करून योग्य वेळेवर झालेली पीक पेरणी ही अपेक्षित उत्पादन देण्यासाठी उपयोगाची होईल. पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करणे महत्वाचे असते त्यानंतर पेरणीसोबत बेसल डोस देणे, योग्य अंतरावर पेरणी करणे जेणेकरून हेक्टरी रोपांची संख्या राखू शकतो.याकरिता रब्बी हंगाम सन २०२२ मध्ये सोयगांव तालुक्यातील दुर्गम भागात सावरखेडा व लेणापुर येथे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांचे मार्फत करडई पिक प्रात्यक्षिक व कृषि विज्ञान केंद्र औरंगाबाद यांचे मार्फत जवस पिक प्रात्यक्षिक राबविण्यासाठी बियाणे वाटप करण्यात आले. यात प्रामुख्याने तेलबिया क्षेत्र विस्तार करणे व तेल उत्पादन घेणे हा मुख्य उद्देश आहे.आजच्या कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्र औरंगाबाद येथील प्रमुख शास्त्रज्ञ झाडे साहेब यांनी पिक लागवड अंतर, पेरणी वेळ व खत व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने करडई पिकासाठी हेक्टरी बियाणे १२ किलो, अंतर 45 बाय 20 सेमी, खत मात्रा २०:२०:०० प्रति हेक्टरी देण्याची व जवस पिकासाठी हेक्टरी २५ किलो बियाणे वापरावे, (शिफारस तेलबिया संशोधन केंद्र लातूर) पेरणी अंतर 30 बाय 15 सेमी ठेवावे, खत मात्रा या पिकास नत्र व स्फुरद या खताची समसमान गरज लागते हेक्टरी २५ किलो नत्र व २५ किलो स्फुरद देणेंची शिफारस करण्यात आली.सदरील बियाण्याचे वितरण कृषि विज्ञान केंद्र औरंगाबाद येथील प्रमुख शास्त्रज्ञ झाडे साहेब, जिल्हा परिषद येथील मोहीम अधिकारी डि. के. गवळी, तालुका कृषि अधिकारी एस. जी. वाघ, मंडळ कृषि अधिकारी जे. के. जाधव, कृषि सहाय्यक बी. आर. चौरे व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ए. एस. महाजन यांचे हस्ते करण्यात आले. आजच्या कार्यक्रमास गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतिशील शेतकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.अशी माहिती कृषी सहायक हेमंत देशमुख सोयगाव यांनी बोलताना सांगितले.

 

0 9 4 8 9 2
Users Today : 64
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *