प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार – : केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपुर्व शिष्यवृत्ती , शालांत परीक्षोत्तर ( पोस्ट मॅट्रीक ) शिष्यवृत्ती व उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती या योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील शाळा , महाविद्यालय व पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांनी सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे . दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपुर्व शिष्यवृत्तीसाठी १५ ऑक्टोंबर , २०२२ पर्यंत विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी . सदोष अर्ज पडताळणी व संस्था पडताळणीची तारीख ३१ ऑक्टोंबर , २०२२ असेल . तरी अधिकाधिक दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तींचा लाभ घेण्यासाठी www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर विहीत कालावधीत नोंदणी करावी .
Users Today : 65