नेत्र. .
मेल्यावरही पाहू जग
सन्मार्ग दिसला छान
नाव नोंदणी आजचं
मरणोत्तर हे नेत्रदान
सोपे सरळ रे सत्कर्म
सुख कुठे या समान
देता आले काही तरी
हा खरा असे सन्मान
दान देतो भीक नाही
याचे मात्र असो भान
सहजच शक्य असे
आपलाचं वाढे मान
भावनेचा खेळ सारा
शरीरआम्हां वाटे धन
गेल्यावर द्यायचे नेत्र
तयार करा जरा मन
बदले कुणाचे जीवन
निर्णय हा नसे सान
खुपकाही केली पापे
आतां होऊ पुण्यवान
आपणास दोन अक्ष
आहो भले भाग्यवान
मरणोत्तर करी दान
होऊ आता गुणवान
दिली दृष्टी छान सृष्टी
सृष्टी रूप आरस्पान
केल्यावरती नेत्रदान
नवे डोळे नवे सपान
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
www.kavyakusum.com
Leave a comment