सोयगाव प्रतिनिधी ; गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे जय कालिंका देवी शिक्षण संस्था संचलित कै लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील वरिष्ठ महाविद्यालय व शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावळदबारा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१५/१०/२२ रोजी भारताचे मिसाईल मॅन भारतरत्न महामाईम आदरणीय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली यावेळेस शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पुस्तक वाचन करून वाचन प्रेरणा दिन साजरा केला व हीच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहिली यावेळेस प्राचार्य प्राचार्य नारायणराव कोलते (पाटील) यांनी सांगितले की कशाप्रकारे डॉक्टर कलाम यांनी तामिळनाडू येथील रामेश्वरम येथे गरिबीच्या व हलकीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन भौतिकशास्त्र व एरोस्पेस या विषयात सखोल अभ्यास केला व त्याच्या माध्यमातून आपल्या देशाचे नाव जगाच्या पटलावर डॉक्टर कलमांनी कशाप्रकारे गाजविले याचे जिवंत उदाहरण म्हणजे आदरणीय डॉक्टर अब्दुल कलाम पोखरण येथील अणुचाचणी असो किंवा मंगळावरील अभियान असो किंवा भारतीय एरोस्पेस मध्ये नवीन नवीन संशोधन असो याबद्दल सर्वप्रथम नाव घेतले जाते ते आदरणीय डॉक्टर कलाम यांचे अनु बाबा संशोधन केंद्र असो किंवा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम एरोस्पेस सेंटर असो या सर्व भारतीय संशोधन केंद्रामध्ये डॉक्टर कलाम यांचे नाव आजही आदरणीय घेतले जाते परिणामी भारताच्या इतिहासात नोंद झालेले व्यक्तिमत्व म्हणून आज जगातील प्रत्येक विद्यापीठांमध्ये डॉक्टर कलाम यांच्या संघर्षाबद्दल संशोधनाबद्दल व मार्गदर्शनाविषयी अनेक अभ्यास मंडळ स्थापित झालेली आहे या माध्यमातूनच डॉक्टर कलाम यांचे जीवन कार्य आपल्याला दिसून येते असे मार्गदर्शन प्राचार्य नारायणराव कोलते यांनी केले विनोद जाधव सहशिक्षक यांनी डॉक्टर कलाम यांच्या जीवनावरती माहिती सांगून विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे का महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना वाचनासाठी सूचना झाली यावेळेस प्रा.जीवन कोलते (सामाजिक कार्यकर्ते)यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे कार्य व नियोजन याबद्दल सखोल मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनावर आधारित अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितल्या व त्यातून आपण काय प्रेरणा घ्यावी हे सांगितले विद्यार्थ्यांमध्ये वाचाल तर वाचाल याविषयी सखोल मार्गदर्शन केले शिक्षणाशिवाय माणसाच्या जीवनात पर्याय नाही व त्याशिवाय प्रगती नाही याचे उदाहरण म्हणजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेब असे आवर्जून सांगितले त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना त्यांनी कमावलेल्या संपत्तीचे सुद्धा विवरण केले एक खोली दहा ड्रेस व तीन हजार रुपये ही डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची एकूण संपत्ती होती हे सांगताना अभिमान वाटला असे जीवन कोलते यांनी आपले मत मांडले आणि आजचा दिवस हा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंतीच नसून जागतिक विद्यार्थी दिन सुद्धा आहे आणि विद्यार्थी या नात्याने प्रत्येकाने आजच्या दिवस वाचन केलेच पाहिजे व आपल्या जीवनामध्ये नवीन ज्ञान व शिदोरी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले आणि त्यानंतर वाचनाला सुरुवात झाली यावेळेस जय कालिंका देवी शिक्षण संस्था अध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते सचिव श्रीमती रत्नाबाई नारायण कोलते व इतर सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. प्राध्यापक पंजाबराव शेळके योगेश थोटे संजय जोशी विकास पाटील विनोद जाधव विजयसिंह राजपूत मुकुंदा व्यवहारे भास्कर ससाने सुदाम राठोड भास्कर खामार श्रीकृष्ण सोनवणे ज्ञानेश्वर राठोड भूषण देसले पोपटराव सोनवणे गणेश मोहनी सतीश सत्रे दिलीप शिसोदे डीडी कोळी विकास बोके मोहन मोरे विनोद चव्हाण अजय रबडे प्रदीप पाटील योगेश राठोड अजबराव चव्हाण श्याम जाधव संदीप कोलते राहुल बडक बाबासाहेब कोलते गोपाल राठोड सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते अशी माहिती गजानन चव्हाण यांनी दिली
Users Today : 16