दस्तापूर येथे पिक प्रात्यक्षिक अंतर्गत शेतकऱ्यांना ज्वारी बियाणे वाटप

Khozmaster
1 Min Read

सोयगाव प्रतिनिधी  ;गोकुळसिंग राजपूत

सोयगाव तालुक्यातील दस्तापूर येथे सोयगाव कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पिक प्रात्यक्षिक अंतर्गत शेतकऱ्यांना ज्वारी बियाणे वाटप

मौजे दस्तापूर ता सोयगाव येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत रब्बी ज्वारी पिक प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले असून त्या अंतर्गत रब्बी ज्वारी चे फुले रेवती या वाणाचे शेतकऱ्यांना तालुका कृषि अधिकारी एस जी वाघ यांच्या हस्ते बियाणे वाटप करण्यात आले यावेळी कृषि पर्यवेक्षक एच. बी.देशमुख, बि टी एम अमोल महाजन, कृषि सहाय्यक जयश्री वाघ, प्रशांत जाधव, सरपंच, उपसरपंच,तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य,शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 4 6 0 2
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *