देवेंद्र सिरसाट;नागपूर-वानाडोंगरी नगरपरिषद क्षेत्रात हिंगणा ते नागपूर मुख्य मार्गाच्या बाजूला असलेले चिकन व मटन दुकान इतरत्र हलविण्यात यावे यासाठी नगरपरिषद कडून दुकानदारांना नोटीस देण्यात आली होती, यामुळे नगरपरिषद व दुकानदार यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावर तोडगा काढत नगरपरिषद ने चिकन मटण दुकानासाठी यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजूला राजीवनगर जवळ जागा उपलब्ध करून दिली परंतु तेथे सुविधा मात्र केल्या नसल्याने त्या सुविधा आधी उपलब्ध करून देण्यात याव्या या करीता दुकानदारांच्या शिष्टमंडळाने स्थानिक आमदार समीर मेघे यांना निवेदन दिले. तेव्हा आमदार मेघे यांनी नगर परिषद चे मुख्याधिकारी नंदनवार यांना सुचना केली की दुकानदारांना ताबडतोब सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या.
निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन दिल्ली,नागपुर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश लारोकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना प्रमोद लारोकर,सुधीर वानखेडे,गजेंद्र काकडे, शेखर लारोकर, प्रभाकर लारोकर, विष्णू लारोकर, कृनाल लारोकर, बशीर पठाण, युनूस महाजन, लीलाधर लारोकर, विशाल राठोड, शखील शेख, तेलंग साहेब, मोहन मोते भुरू शेख इत्यादिची उपस्थिती होते.