स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ‘ठोक बर्डी ‘ वासीयांच्या नशिबी नरकयातना !

Khozmaster
3 Min Read

गावाला आलेय गटाराचे स्वरूप ॥ ७५ वर्षांपासून मुलभूत सुविधाच नाहीत » समस्या न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा विनोद वसु अकोट ता प्रतिनिध.अकोट तालुक्यांतर्गत येणाऱ्या ठोक बर्डी मध्ये स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही प्राथमिक सुविधा पोहोचल्या नसून, ग्रामस्थांना नरकयातनांचा अनुभव येत आहे. गाव रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असूनही जिल्हा प्रशासनाने या समस्यांचा निपटारा करावा, अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.एकीकडे प्रत्येक गाव इंटरनेटने जोडले गेले असताना दुसरीकडे अनेक गावे स्वातंत्र्यापूर्वीची आहेत की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. अकोट तालुक्यात येणाऱ्या ठोक बर्डी हे लहानसे गाव आहे. या गावची लोकसंख्या सुमारे अंदाजी २५० असून, गाव जऊळखेड गटग्रामपंचायतमध्ये येते. ठोक बर्डी येथील १ सदस्य तर जऊळखेड येथील ६ सदस्य अशी ग्रामपंचायतची संरचना आहे ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती असून, शेतीवर सर्वांचा प्रपंच अवलंबून आहे. परंतु, स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना गावात मात्र रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधा अद्यापही पोहोचू न शकल्याने गावकरी अनेक संकटाचा सामना करत महिनाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गावात सर्वच पाणी साचले असून, रस्त्याला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या गावातील संदीप तरोळे यांच्या घरापासून रस्त्यावर पाणी साचले असून, त्यामुळे अनेक साथीचे आजार पसरत आहे. ग्रामस्थांच्या जिवावर बेतत असलेली सद्यःस्थिती देऊन भयावह असून, गावातून मार्ग काढताना तारेवरची – कसरात करावी लागत आहे. पूर्ण पावसाळाभर मार्ग गावातील रस्त्यांवर जागोजागी गटारे आणि चिखलसदृश स्थिती असल्याने आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाने या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष देऊन समस्यांच्या निपटाऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करावी अन्यथा नागरिक उपोषणाचा मार्ग अवलंबण्याच्या तयारीत आहेत, असा इशारा देण्यात आला आहे :याबाबत ग्रामपंचायत सचिव यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही   गावात सर्व रस्त्यांवर पाणी असल्याने घरात ये-जा करणे कठीण आहे. साचलेल्या पाण्यामुळे अनेक आजारांचा सामना गावकरी करीत आहेत.– संदीप तरोळे , सामान्य नागरिक, ठोक बर्डी स्थानिक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष यंदा वरुणराजाने चांगली कृपादृष्टी केल्याने पावसाची रिपरिप अद्यापही सुरूच आहे. एकीकडे शेतांमध्ये ओल कायम असताना गावातील गटारींमुळे घरांनादेखील ओल लागली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आरोग्याची समस्या भेडसावत असून, ग्रामपंचायतसह प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *