अकोला –
माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने माहेश्वरी भवन येथे रंगारंग उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. होळीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात काशी विश्वनाथ गटाने सादर केलेले ‘चार युगांची होळी’ हे आकर्षक सादरीकरण विशेष ठरले.
कार्यक्रमाची प्रस्तावना मंडळाच्या सचिव शोभा बियानी यांनी केली, तर कार्यक्रमाचे संचालन ज्योती बियानी यांनी केले. या प्रसंगी अध्यक्ष वंदना हेड़ा, सचिव शोभा बियानी, उपाध्यक्ष मंजू गट्टानी, कोषाध्यक्ष अनीता गांधी, सल्लागार हेमा खटोड, शिल्पा चांडक, उपाध्यक्ष आरती जाजू, सहसचिव राधा टावरी, सुनीता हेड़ा आदी पदाधिकाऱ्यांचे टोपी, गॉगल्स व चॉकलेटच्या माळांनी स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात काशी विश्वनाथ गटाने सादर केलेले ‘चार युगांची होळी’ हे नाट्यरूप सादरीकरण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. यात शिवाची भूमिका राधिका हेड़ा, पार्वती मीनल बियानी, राम रोशनी कलन्त्री, सीता वैष्णवी काबरा, कृष्ण रानी चांडक, राधा राधिका खटोड, कलियुग होळी पूजा चांडक व साक्षी बियानी, नारद किरण राठी, तर ब्रजवासी कंचन नवंदर यांनी साकारल्या. या सादरीकरणाचे प्रशिक्षण हीरल गणत्रा यांनी दिले.
कार्यक्रमात फुलांची होळी, विविध खेळ व हॉउजीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला.
स्पर्धांमध्ये प्रथम – मोनिका तोष्णीवाल, द्वितीय – मीना मोहता, तर विविध गटांमध्ये सविता गांधी (गुलाल), प्रीति लड्डा व मीना मोहता (पिचकारी), नीता भाला (होलीका), कल्पना बियानी (गुब्बारे), भारती सारडा (होळी क्वीन), पुष्पा मंत्री (गुजिया) तसेच सुमित्रा खटोड व सुषमा काकानी (फुल हॉउजी) यांना सन्मानित करण्यात आले.
या रंगारंग कार्यक्रमामुळे माहेश्वरी महिला मंडळाच्या सदस्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले
Users Today : 46