सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतील मोहीम माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी अंतर्गत सोयगांव तालुक्यातील दुर्गम भागात दस्तापूर येथे सोयगाव कृषी विभागाच्या वतीने कर्मचारी जाऊन सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी गावकारींना मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या विविध समस्या जाऊन घेतल्या. शेतकरी वर्गाशी संवाद साधताना विवध पिकातील किड व रोग नियंत्रण, खतांचे व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, महाडीबीटी योजनेची माहिती, शेतकरी गट माहिती तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आजच्या कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्य वर्षनिमित्त राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानअंतर्गत ज्वारी बियाण्याचे शेतकरी याना वाटप करण्यात आले. तसेच यावेळी गावातील प्रगतिशील शेतकरी यांनी अडचणी मांडल्या यात प्रामुख्याने शेतकरी वर्गास दिवसा वीज मिळावी, वन्य प्राण्यांपासून शेताला कुंपण मिळावे, शाळेचा रस्ता दुरुस्त करावा तसेच सौर ऊर्जा प्रत्येकाला मिळावी आदी मागण्या मांडण्यात आल्या. आजच्या कार्यक्रमास प्रामुख्याने तालुका कृषि अधिकारी एस. जी. वाघ, कृषि पर्यवेक्षक एच. बी. देशमुख, कृषि सहाय्यक जे. एन. वाघ, पी. व्हि. जाधव व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ए. एस. महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रगतशील शेतकरी यांची उपस्थिती होती.अशी माहिती कृषी पर्यवेक्षक हेमंत देशमुख यांनी दिली.