नागपूर:- राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोदी सरकार मधील हेवीवेट मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर जिल्हात भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने धोबीपछाड दिला आहे.नागपूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडणुकीचे निकाल नुसतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यातच भाजपचा मानहानीकारक पराभव झाला आहे. 13 पैकी एकाही पंचायत समितीमध्ये भाजपचा सभापती होऊ शकलेला नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये भाजपचा कुठल्याही पंचायत समितीत सभापती होऊ शकला नाही, तर अवघ्या दोन पंचायत समितीत उपसभापती झाले आहेत. मात्र, शिंदे गटाचा एक उपसभापती झाला आहे.13 पंचायत समिती पैकी 9 पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे सभापती निवडून आले आहेत. हा भाजपसाठी मोठा धक्का आहे.संपुर्ण महाराष्ट्र काबीज करू पाहणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची कार्यपद्धती नागपूर जिल्ह्यातच नाकारली गेल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.नागपूर ग्रामीण, कामठी, सावनेर, कळमेश्वर, पारशिवनी,उमरेड, मौदा, कुही, भिवापुर या ठिकाणी कॉग्रेसचे सभापती झाले आहेत. तर, नरखेड, काटोल, हिंगणामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे सभापती झाले आहेत. तर शिंदे गटाने ही रामटेक पंचायत समिती आपल्या त्याबाबत घेत आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे, येथे शिंदे गटाचा सभापती झाला आहे. फक्त रामटेक आणि मौदा तालुक्यात भाजपचे उपसभापती झालेले आहेत.त्यामुळे आगामी काळात भाजपासाठी हि धोक्याची घंटा म्हणावी लागेल, माजी मंत्री सुनील केदार यांनी आपला झंझावात यानिमित्ताने कायम राखल्याची चर्चा सध्या नागपूर जिल्ह्यात सुरू आहे.