निवडणूक सु संपन्न
झाल्या गावागावात
शिक्षणाचे शुध्द रक्त
उसळून यावे अंगात
प्रलोभन अविचारही
नको यायला मनात
मतदान कर्तव्य असे
घुमावे शब्द कानात
शिक्षण ते डोकवावे
लक्ष्मणरेषा प्रचारात
पोक्त पणा मुरलेला
दिसावा तो विचारात
जिंकताचं निवडणूक
उत्सव न ते उन्मादात
पराजीत उमेदवाराने
स्विकार ते आनंदात
मातीशी जोडते नाते
ते संबंध नसा नसात
महत्वाची म्हणून गा
रे निवड गाव कुसात
सुशिक्षीत आहे जाण
कसूर नको कर्तव्यात
खास असे ही खुर्ची
ही आगळी विख्यात
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996
www.kavyakusum.com
Users Today : 6