सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील टिटवी येथे महषीं वाल्मिकी ऋषी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. टिटवी येथे महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस पाटील मधुकर गौलखेडे, सरपंच भागवत जाधव यांनी केले तसेच उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच गावात मिरवणुकीला सुरुवात झाली. चौका चौकात महिलांनी रांगोळ्या काढून चौक सुसोभित केले होते. ढोलताशांच्या गजराज टिटवी गाव दुमदुमून गेले होते. महषीँ वाल्मिकी ऋषी यांच्या दर्शनासाठी महिलांनी एकच गदीँ केली होती.यावेळी गावातील माजी सरपंच ताराचंद राठोड, प्रमोद पाटील, उपसरपंच लव राठोड, विनोद जाधव,संदीप जाधव,पो.पा.ज्ञानेश्वर राठोड,दांडगे, जाधव, गौलखेडे,कांडेलकर,उपस्थित होते. महषीँ वाल्मिकी ऋषीच्या मिरवणूकीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता सपोनि देवीदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिटजमादार मिरखाँ तडवी, पो.काँ.शिवदास गोपाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता अशी माहिती सरपंच भागवत जाधव यांनी बोलताना सांगितले.
Users Today : 43