प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:गांजाची शेती करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई , 3 लाख 52 हजार रुपये किमंतीचा 50 किलो गांजा जप्त. या बाबत अधिक माहिती अशी कि, नंदुरबार जिल्ह्यात कोणत्याही अंमली पदार्थाचा प्रसार होवू नये म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे खुप संवेदनशील असून गांजा , अफु इत्यादी प्रकारचे अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक , लागवड करणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक . पी . आर . पाटील यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते . त्यामुळे जिल्ह्याचे सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा हे अंमली पदार्थाची चोरटी वाहतूक व लागवड यांचेवर कारवाई करणे साठी त्याबाबतची माहिती घेत होते . दि. 16 ऑक्टोंबर रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक . पी . आर . पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील फेस – बामखेडा गाव शिवारात एका इसमाने त्याचे कपाशीचे पिकाचे शेतात बेकायदेशीररीत्या गांजाचे झाडांची लागवड केली असल्याची खात्रीशिर बातमी सांगितली . पोलीस अधीक्षक . पी . आर . पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो. निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांचे एक पथक तयार करुन त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले . स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ व त्यांचे अमंलदार हे मिळालेल्या गोपनीय बातमीच्या ठिकाणी फेस – बामखेडा गावाचे शिवारात कापसाचे पीक असलेल्या शेतांकडे पायी गेले असता सदर बातमी मधील संशयीत एका कापसाचे पिकाचे शेतात हालचाली करत असल्याचे दिसुन आले , पोलीसांचे पथक त्याच्या दिशेने येत असल्याचे समजताच त्याने तेथुन पळ काढला . स्थानिक गुन्हे शाखा व सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमंलदारांनी त्यास पाठलाग करुन जंगलात पळुन जाणाऱ्या इसमाला पकडण्यात यश आले . पकडलेल्या इसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव राकेश हिरालाल शिरसाठ (वय 32) वर्षे रा. बामखेडा ता . शहादा जि . नंदुरबार असे सांगितले . पोलीसांनी कापसाच्या शेताची पाहणी केली असता शेतात आतील बाजुस ठिकठिकाणी हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसुन आले , म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या संपुर्ण शेती पिंजून काढली असता तेथे 50 किलो 315 ग्रॅम वजनाचे 3 लाख 52 हजार 205 रुपये किंमतीची एकुण 25 गांजाची झाडे मिळुन आल्याने गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेतला . तसेच राकेश हिरालाल शिरसाठ (वय 32 वर्षे) रा. बामखेडा ता . शहादा जि . नंदुरबार याचे विरुध्द् सारंगखेडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 187/2022 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम -1985 कलम 8 ( क ) , 20 ( ब ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सपोनि संदीप पाटील सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दिपक गोरे , पोलीस नाईक दादाभाई मासुळ , विकास कापुरे , पोलीस अमंलदार किरण मोरे , राजेंद्र काटके फॉरेन्सीक टीमचे पोलीस अंमलदार दिनेश लाडकर , संजय रामोळे , चेतन चौधरी , सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार शानाभाऊ ठाकरे , विजय गावीत यांचे पथकाने केली असुन पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे .नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक. पी . आर . पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की , तंबाखूजन्य व अमंली पदार्थांचे सेवन केल्याने स्वास्थ्यावर दुष्परिणाम होवून विविध प्रकारचे आजार होतात . तसेच अंमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे मनुष्याची आर्थिक , सामाजिक हानी होवून त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबीयावर होत असतो . तसेच आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून लांब राहावे असे आवाहन केले .
( पी . आर . पाटील भा.पो.से. ) पोलीस अधीक्षक , कृषी नंदुरबार