शेतकरी बंधू, शेती प्रेमी, व नागरिकांनी उपस्थित राहा प्रा.जीवन कोलते यांचे आवाहान सोयगाव:- येथील अजिंठा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी मंत्री कै. बाबुरावजी उर्फ आप्पासाहेब काळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक १८/१०/२२ रोजी सकाळी अकरा वाजता संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्यावतीने “भव्य शेतकरी संवाद मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे.या संवाद मेळावाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.डॉ. पंजाबराव डख उपस्थित राहणार आहे. या सुवर्ण संधीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशे आवाहन प्रा.जीवन कोलते यांनी केले आहे.मेळाव्याचे उदघाटन प्रसिद्ध हवामान अभ्यासक श्री पंजाबराव डख यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष औरंगाबाद मा. रंगनाथनाना काळे अभ्यास शिक्षण संस्था हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी असणार आहे. तर मा श्री तुळशीरामचंद पाटील (वन शेती पुरस्कर्ते) व मा डॉ भालचंद्र वायकर (अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून अजिंठा शिक्षण संस्थेचे सचिव मा प्रकाशदादा काळे व प्राचार्य डॉ गणेश अग्निहोत्री यांची उपस्थित असणार आहे.शेतकरी संवाद मेळावा यशस्वी व्हावा यासाठी प्राचार्य डॉ राजेश यादव, उपप्राचार्य डॉ शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे, कनिष्ठ विभागप्रमुख डॉ उल्हास पाटील, पदव्युत्तर समन्वयक डॉ छत्रघन भोरे, संयोजन समिती प्रमुख डॉ भाऊसाहेब गाडेकर, डॉ पंकज शिंदे, डॉ सैराज तडवी, प्रा अनिल मानकर, प्रा रवी जाधव, डॉ गणेश मिसाळ यांच्यासह संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहणार आहे. तरी सोयगाव तालुक्यातील व सावळदबारा परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने शेतकरी संवाद मेळावाला उपस्थित राहावे असे आवाहन प्रा. जीवन कोलते(सामाजिक कार्यकर्ते)सावळदबारा ता सोयगाव यांनी केले आहे.
Users Today : 43