बिन विरोध..

Khozmaster
1 Min Read

विरोधक सत्ताधारी

दोघांची एक आवड

कधीकधी छान होई

रे बिनविरोध निवड

 

निवडणूक प्रक्रियेची

नको उगाचं कडकड

प्रचाराचा राडा नको

वेडी वाकडी बडबड

 

कोण जिंकले हरले

नाही उरात धडधड

गाडी चाले रूळावर

नाही मुळी खडखड

 

दोन्ही बाजू समतोल

तेंव्हा तोलते कावड

वेळपैसा दोन्ही वाचे

चांगल्या कार्यांसवड

 

सर्वां मान्य उमेदवार

काम असते अवघड

चुक होता जरासुद्धा

नंतर वेगळी गडबड

 

अविरोध निवडणूक

रे कधीअसते निकड

खूपकाही शिजे मागे

ती खिचडी फक्कड

 

– हेमंत मुसरीफ पुणे 

   9730306996..

   www.kavyakusum.com

0 9 4 2 4 9
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *