पातूर पंचायत समितीवर वंचितचा झेंडा

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर :– पंचायत समिती पातूर येथे सभापती व उपसभापती निवडणुकी करिता पातुर पं. स. येथे आज रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये वंचित बहुजन आघाडीने बाजी मारली आहे.ऑक्टोबर 2022 रोजी पातूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक झाली,या निवडणुकीत शिवसेनेच्या(ठाकरे गट) वतीने सभापती पदाकरिता मनीषा अजय ढोणे तर उपसभापती पदाकरिता गोपाल ढोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होता,तसेच वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने सभापती पदाकरिता सविता अर्जुन टप्पे तर उपसभापती पदाकरिता इमरान खान यांचा उमेदवारी अर्ज दाखल होता.दरम्यान शिवसेना(ठाकरे गट) व वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांचे सदस्य संख्या बळ 6-6 असे सारखेच असल्याने सदर निवडणुकीचा निर्णय ईश्वर चिट्ठीने घेण्याचे ठरविल्या गेले.पातूर शहरातील दोन चिमुकल्यांनी ईश्वर चिठ्ठी काढून सभापती व उपसभापती ही दोनही पदे वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यात पडल्याने शिवसेनेच्या(ठाकरे गट) मनीषा ढोणे व गोपाल भगवान ढोरे यांचा पराभव झाला असून वंचित बहुजन आघाडीच्या सविता अर्जुन टप्पे सभापती तर इमरान खान यांची उपसभापती म्हणून निवड झाली असून पातूर पंचायत समितीवर वंचितचा झेंडा फडकला.        यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून पातुर चे तहसीलदार दिपक बाजड तर नायब तहसीलदार विजय खेडकर,पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उल्हास मोकळकार यांनी काम पाहिले तर पातूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक माजिद पठाण,हे.कॉ.मोहन भारस्कर, येनकर मेजर,पो.ना.संभोधी इंगळे,वसंत राठोड, विकास जाधव, निलेश राठोड,पवार मेजर यांनी बंदोबस्त पार पडला.

 

 

0 9 4 7 5 1
Users Today : 40
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *