परतीचा पाऊस ..

Khozmaster
1 Min Read

परतीचा पाऊस .

 

जाता जाता पाऊस

का पुरवून घेतो हौस

पुढल्यावर्षी वेळेत ये

चिडून नको जाऊस

 

जाता जाता पाऊस

का घालतो धुडगूस

रिक्त हाती जावेना

बा नको दुःखी राहूस

 

जाता जाता पाऊस

का करतो धुस फूस

या वेळी झाली चूक

पाण्यात नको पाहूस

 

वाट्टेल तसा बरसतो

कसा काढतो जुलूस

अमृताचे हात तुझे रे

कर्तुत्व नकोविसरुस

 

जाता जाता पाऊस

का पुन्हा होई मायूस

रडत रडवत जातोस

निरोपअसा न घेऊस

 

भरवसा असे तुजवर

नाहीस तू बा माणूस

करू नको धुस फूस

जाता जाता पाऊस

 

-हेमंत मुसरीफ, पुणे

 9730306996.

www.kavyakusum.com

0 9 4 2 4 9
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *