प्रवासांनी याचा लाभ घ्यावा भाजपा जि.उपध्याक्ष जयप्रकाश चव्हाण यांचे आवाहनऔरंगाबाद, दिवाळीचा सन काही आठ दिवसावर येवून ठेपल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. त्यामुळे रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून दिवाळीसाठी चार विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दरम्यानच्या काळातील गर्दी बघता, गाड्यांमध्ये अधिक वाढ करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे जिल्हा उपध्याक्ष जयप्रकाश चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याकडे केली होती. त्यांची मागणी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी मंजूर करून विशेष गाड्या वाढविण्यात आलेल्या आहेत तरी विशेष गाड्यांचा जास्तच जास्त प्रवासांनी लाभ घ्यावा असे आवाहन जि.उपध्याक्ष जयप्रकाश चव्हाण यांनी केले आहे.दिवाळी उत्सव आठ दिवसावर आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर संपूर्ण देशात दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येणार. दिवाळीला शाळा, महाविद्यालयाला सुट्ट्या असतात. यामुळे दिवाळीच्या वेळी कामानिमित्त अन्यत्र राहणारे कुटूंब उत्सवासाठी घरी जातात. सुट्ट्यांमध्ये दिवाळीनंतर नातेवाईकांच्या भेटीसाठी, पर्यंटनासाठी नागरिक बाहेर पडतात. प्रवासासाठी नागरिकांची प्राथमिकता रेल्वेला असते. यामुळे दरम्यानच्या काळात रेल्वेवर प्रचंड गर्दी वाढते. हिच बाब लक्षात घेऊन 22 ऑक्टोबरपासून दिवाळीसाठी चार विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे.अमरावती – जबलपुर दरम्यान नुकतेच गाडीला सुरुवात झाली आहे. गाडी क्रमांक 12160 जबलपुर – नागपूर हि गाडी आता अमरावती स्टेशनपर्यंत व गाडी क्रमांक 12159 अमरावती – जबलपूर स्टेशन दरम्यान धावेल. सध्या दुरुस्तीच्या कामासाठी अनेक गाड्या बंद आहेत. त्यामुळे ही गाडी सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या दिलासा आहे.अशी माहिती जि.उपध्याक्ष जयप्रकाश चव्हाण यांनी बोलताना दिली.
Users Today : 43