राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वक्त प्रशिक्षण विभाग बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी निवड
मोताळा तालुक्यातील आदर्श गाव सिंदखेड गावाचे भुमिपुत्र ॲड.पवन देविदास मेहेंगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वक्ता प्रशिक्षण विभाग बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सर्व सामान्य कार्यकर्ता नंतर वक्ता प्रशिक्षण विभाग तालुकाध्यक्ष ते जिल्हाध्यक्ष पदापर्यंत अतिशय खडतर प्रवास आहे. 2012 पासून वक्तृत्वाची आवड असताना विधी महाविद्यालयामध्ये अनेक वकृत्व स्पर्धा करून यश मिळवत पुढे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी समाज प्रबोधन व्याख्यानाच्या माध्यमातून लोकांचं जनजागृती करून सर्वसामान्य पर्यंत पोहोचण्याचा काम केलं. याच कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वक्ता प्रशिक्षण विभाग प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. प्रदिप दादा सोळुंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वक्ता प्रशिक्षण विभागाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीपत्र दिले. या नियुक्ती च्या पाठीमागे ज्यांच्या आशीर्वादाने मिळाले ते बुलढाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलढाणा जिल्हाध्यक्ष मा.श्री.ॲड.नाझेर काझी साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलढाणा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मा.श्री. नरेश भाऊ शेळके, यांच्या आशीर्वादाने वक्तास प्रशिक्षण विभागाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.मी पक्षाच्या पक्ष वाढीसाठी व पक्षाचे कार्य हे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील व कटीबद्ध राहील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
Users Today : 15