घबाड ..

Khozmaster
1 Min Read

( परतीच्या पावसा ) 

 

पाऊस असा उनाड

पडतो कसा धडाड

करी विध्वंस इकडे

हवा थोडासा उघाड

 

जा ना बाबा तिकडे

वावर जाहले उजाड

स्वागत होईलं तुझे

करतीलं सगळे लाड

 

काळ्याढगा पांडुरंगा

करी कृपा जीवापाड

न्याय करी सर्वां वरी

सापडो सर्वां घबाड

 

जमीनीत असा घुसा

बहरावे झुडूप झाड

हिरवीगार शेतीभाती

व्हावी जंगलात वाढ

 

ऋतुमाना प्रमाणे अरे

ढगा रे पावसाले पाड

दीवाळी येई तोंडावर

जावे बाबा रे पल्याड

 

जा परतीच्या पावसा 

बदल आता बि-हाड

जाताना माणसाची

घेऊन जा रे कु-हाड

 

– हेमंत मुसरीफ पुणे 

  9730306996

  www.kavyakusum.com

0 9 4 2 4 9
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *