मुख्यालयी राहत नसल्याने तुम्हीच सांगा विकास कसा होणार?
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सर्वात शेवटचे टोक असलेले पिंपळवाडी व महाल्बदा अतिदुर्गम आदिवासी बहुल भाग म्हाणून ओडखला जातो. जिल्हा परिषदेमार्फत राज्यशासनाच्या व केंद्रशासनाच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. कल्याणकारी शासन म्हणून या सेवा ग्रामीण भागातील जनतेला सर्वकाळ उपलब्ध होतील, असेशासनाकडून पाहिले जाते.
ग्रामसेवक हा गाव आणि सरपंच यामधील विकासात्मक दुवा समजला जातो. सोयगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिंपळवाडी, महाल्बदा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसून ग्रामसेवक अंशु भोवते हे महाशय सिल्लोड येथे राहत असून तिथून करतात आपडाऊन अशा लांब पल्ल्याच्या ठिकाणाहून आठवड्यातून एक दिवस ‘अपडाऊन’ करतात. त्यामुळे गावविकासाला ‘खीळ’ बसेल हे सहजच आहे.हाकेच्या अंतरावर देव्हारी येथील ग्रामसेवक सुरेश काळे यांनी ग्रामसंसद देव्हारी हे नंदनवन बनवत आहे.तसेच मोलखेड्यात महिला ग्रामसेविका सुरेखा पवार असून मोलखेडा,हिवरी गावला विकासाकडे नेत आहे.येथे मात्र पिपंळवाडी, महाल्बदा जशेच्या तशेच आहे.
त्यामुळे तुम्हीच सांगा गावाचा विकास कसा साधणार? असा सवाल पुढे आला आहे.याचा अर्थ असा त्यांना गावाचे वावडे असे दिसून येत आहे.
यासाठी जिल्हा परिषदेमार्फत नियुक्त केल्या जाणाऱ्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे.मात्र ते या आदेशाला केराची टोपली समजत आहे। ग्रामसेवक गावाचा नालि साफ सफाई ,नल योजना , पथ् दिवे , धूर फवारणी,मुलांना दाखले देणे पिपंळवाडी, महाल्बदा मध्ये यांनी धुर फवारणी केलि नाहीच.सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याचा ग्रामविकास विभागाने धोरणात्मक निर्णय देखील घेतला आहे. मात्र, सदर निर्णयाची पायमल्ली होताना दिसून येत आहे. याकडे वरिष्ठांचा असलेला दुर्लक्षपणा कारणीभूत असल्याचे चित्र आहे. गावात कोणत्या समस्या आहेत, कोणती कामे करायची आहेत याची साधी कल्पना नसते कारण गावात कधी फिरकूनही पाहत नाहीत. गाव म्हटले की समस्यांचा जणू पाढाच असतो.असे प्रकार पिंपळवाडी ग्रामपंचायतीमध्ये आठवडा भर तर कधी महिनाभर ग्रामसेवकांचे तोंड पाहिले नसल्याचे गाव करी सांगत आहे.याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का अशा प्रश्न मात्र आता पिंपळवाडी ग्रामस्थांना पडला आहे.
Users Today : 15