सोयगाव दिवाळीत फटाके फोडताना सुरक्षेची काळजी घ्यावी; माजी सभापती धरमसिंग चव्हाण

Khozmaster
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव शहरात व सावळदबारा परिसर ग्रामीण भागात आहे.लहान मुलांनी दिवाळीत फटाके फोडताना सुरक्षेची काळजी न घेतल्यास अपघाताची शक्यता असते. है टाळण्यासाठी व आनंदात दिवाळी साजरी करण्यासाठी सुरक्षितता बाळगणे महत्वाचे आहे.माजी पंचायत समितीचे सोयगाव सभापती धरमसिंग चव्हाण सुरक्षितेची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. आग लागल्यास १०१ डायल करा दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा सण आहे. मात्र, हा सण साजरा करताना अनेकदा अघटित घटना घडतात. त्या घटना घडू नयेत यासाठी सुरक्षितरीत्या दिवाळी साजरी करावी. ग्रीन फटाके लावताना विशेष काळजी घ्यावी.शासनाने ग्रीन फटाके फोडण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच दिलेल्या सूचनांचे नियमांचे पालन करावे. ग्रीन फटाके फोडताना सुरक्षेबाबत योग्य खबरदारी घेतली जावी, असे आवाहन माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी केले आहे. फटाके विक्रेत्यांना आवाहन फटाक्यांची दुकाने लावताना आवश्यक खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. दुकान तयार करताना ज्वलनशील साहित्याचा वापर करू नये, दोन दुकानांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, अधिकृत प्रमाणित दर्जाचे फटाके ठेवावे, दुकानाच्या जवळ कुणालाही फटाके फोडू देऊ नये, दुकानात मेणबत्ती, लायटर किंवा आगपेटी जाळू नये, दुकानात धूम्रपान करू नये, इलेक्ट्रिक बल्ब आणि फटाक्यांमध्ये अंतर ठेवावे, जारी केलेल्या निर्देशानुसार पाणी, रेतीची बादली आणि अग्निशमन यंत्र दुकानात ठेवावे,असेही आवाहन करण्यात आले आहे. फटाके जाळताना फटाक्यांच्या बॉक्सवरील सुरक्षाविषयक सूचनांचे पालन करावे. फटाके फोडताना नेहमी पाणी आणि रेतीची बादली जवळ ठेवावी. फुलझडी, रॅकेट वापरून झाल्यानंतर त्यांना पाणी किंवा रेतीच्या बादलीत टाकावे. घरांच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवावे, फक्त अधिकृत मानक फटाके वापरावे. फटाक्यांसाठी खुली जागा सुरक्षित असते, वस्तीमध्ये फटाके फोडणे टाळावे. सुती कपडे तसेच सुरक्षेचा दृष्टीने बूट आणि चष्मा लावावा, फटाके फोडताना वृद्ध, मुले आणि महिलांची काळजी घ्यावी. लहान मुलांच्या हातात फटाके देऊ नये. न फुटलेल्या फटाक्यांना हात लावू नये, घरात किंवा घराच्या अगदी जवळ फटाके फोडू नये. – फटाक्यांजवळ दिवे अगरबत्ती किंवा मेणबत्ती ठेवू नये. आपल्या परिसरातील ज्वलनशील कचरा नष्ट करावा. अनार तसेच वर जाणारे फटाके वस्तीत फोडू नये.अशे आवाहन मा.सभापती धरमसिंग चव्हाण यांनी केले आहे.

 

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *