पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी केला सपोनि अनमोल केदार व पो.काँ.सादिक तडवी यानां ट्राफी देऊन केला सत्कार

Khozmaster
1 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपुत्र सोयगाव शहराचे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार व पो.काँ.सादिक तडवी यांना औरंगाबाद येथे ट्राफी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मा विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र यांच्या संकल्पनेतून प्रत्येक पोलीस स्टेशन येथे हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेणेकरिता एका विशेष अंमलदाराची नेमणूक करण्यात आली आहे. सदर संकल्पनेची अतिशय चोख बजावणी करण्यासाठी मा पोलीस अधीक्षक श्री मनीष कलवनिया यांनी पदभार संभाळल्यापासून प्रत्येक महिन्यात उत्तम कामगिरी करणारे पोलीस अधिकारी / अंमलदार यांना गुन्हे बैठकीत सन्मानित करण्याची सुरवात करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस स्टेशन सोयगाव कडील मनुष्य मिसिंग सेल चे कामकाज करणारे पो. कॉ.सादिक तडवी सोयगाव पोलीस ठाणे यांनी मागील तीन महिन्यात अतिशय उत्तम कामगिरी करत पोलीस स्टेशन हद्दीतून हरवलेल्या 10 पैकी 10 मनुष्य मिसिंग चा शोध घेऊन औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. त्याबद्दल दि.१८/१०/२२ रोजी मा पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण व मा अपर पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांनी गुन्हे बैठकीत पोलीस स्टेशन सोयगाव चे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अनमोल विनायक केदार व मनुष्य मिसिंग सेलचे पो.काँ. सादिक तडवी यांना ट्राफी देऊन सन्मानित केले आहे.यामुळे सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात सर्वत्र सोयगाव पोलीस स्टेशनचे व सपोनि अनमोल केदार व पो.काँ.सादिक तडवी यांचे कौतुक करून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *