सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जामनेर तालुक्यातील पहुर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी – शिक्षकांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दि.१८/१०/२२ रोजी घेतली . दरवर्षी इको फ्रेंडली क्लबच्या वतीने शाळेतर्फे फटाके मुक्त दिवाळीचा संकल्प केला जातो . फटाक्यांमुळे वायु प्रदूषण , ध्वनी प्रदूषण तसेच पर्यावरणाची हानी होते , त्यामुळे फटाके न फोडता सर्वांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करावी ,असे आवाहन इको फ्रेंडली क्लबचे अध्यक्ष शंकर भामेरे यांनी केले . यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही . व्ही . घोंगडे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Users Today : 39