सोयगाव कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी यांचे आवाहान सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील व सावळदबारा परिसरातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ यांचे शेतकऱ्यांना आवाहन शेतकरी बांधवांनो फक्त आपल्या शेतातील पिकाचा पीक विमा काढून आपल्याला क्लेम (पैसे) मिळणार नाहीये त्यासाठी तुम्हाला तक्रार पण करावी लागणार आहे तरच तुम्हाला त्याचे क्लेम (पैसे) मिळतील हे पण लक्षात घ्या. त्यामुळे आजच पीक विमा कंपनी कडे आपल्या पिकाची नुकसान झाल्याची तक्रार करा.शेतक-यांसाठी महत्वाचे सोयगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे किव्हा ज्या शेतक-यांचे नदीचे पाणी शेतात शिरून पिकांचे नुकसान झाले असेल त्यांनी खरीप हंगाम पिक विमा भरलेला असेल तर त्यांनी ७२ तासात पिक विमा कंपनीकडे नुकसानीच्या ऑनलाइन किंवा ऑफलाईन तक्रार करावी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय सोयगाव येथे तात्काळ संपर्क साधावा.किंवा तक्रार करण्यासाठी हे App डाउनलोड करा.https://play.google.com/store/apps /details?id=in.farmguide, farmerapp अशी तक्रार करावी अशी माहिती सोयगाव कृषी पर्यवेक्षक हेमंत देशमुख बोलताना सांगितले.
Users Today : 39