जाळीचादेव येथे सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी अष्टशताब्दी महोत्सव उत्साहात साजरा

Khozmaster
2 Min Read
कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार जाळीचादेवला विकासाची चालना देणर यांची ग्वाही
  सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जाळीचादेव हे तिर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे राज्यात प्रसिद्ध आहे.दि.२९/८/२२ सोमवार रोजी कलीयुगातील परब्रम्ह परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामी याचां अवतार दिन म्हणून मोठ्या थाटामाटात सायंकाळी आठ वाजता मिरवणूक काढून साजरा करण्यात आला. दुपारी बारा ते चार महाप्रसादाचे आयोजन पुजारी मंडळी यांच्या कडून करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक भक्तांनी घेतला.सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी अष्टशताब्दी महोत्सव निमित्त श्री क्षेत्र जाळीचा देव येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तिर्थस्थानास देवास मंगल स्नान घालण्यात आले. तदनंतर ध्वजारोहण पारध येथील पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते करण्यात आले. तर धर्मसभा अध्यक्ष मेहकरकर बाबा महानुभाव यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार भेट देऊन भरघोस निधी देणार असल्याची ग्वाही दिली. नैसर्गिक सानिध्यात सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले जळीचादेव संस्थान येथे भाविकांसाठी पायाभूत व मूलभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने  सर्वोतोपरी मदत करू अशी ग्वाही कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी जाळीचादेव येथे विश्वस्त व गावकऱ्यांशी बोलतांना दिली.
जाळीचादेव संस्थान येथे विकास कामे करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार संतोष दानवे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी, संस्थानचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात बैठक घेवून या बैठकीत जाळीचादेव संस्थान येथे संरक्षण भीत व विकास कामे करण्याबाबतचा तिढा सोडवू असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. यावेळी जाळीचादेव संस्थानच्या वतीने ना. अब्दुल सत्तार यांचा स्वागत सत्कार करण्यात आले. तसेच येथील विश्वस्थानी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मंत्री अब्दुल सत्तार यांना दिले. तर कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी अष्टशताब्दी महोत्सवाच्या भाविकांना शुभेच्छा दिल्या. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. त्यानंतर येथील श्री. चक्रपाणी आश्रमास त्यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी जाळीचादेव येथील  सरपंच सुधाकर उदरभरे, अमृतराज मेहकरकर , राजू पुजारी ,बाळू पुजारी ,वसंतराव पुजारी , दामुअण्णा पुजारी, अनिल पुजारी, सुरेश पुजारी, प्रा.बप्पासाहेब उदरभरे अजित पुजारी,सचिन पुजारी, रमेश मानेकर,व माजी सभापती धरमसिंग चव्हाण,सावळदबारा येथील माजी सभापती शिवाआप्पा चोपडे,सुरेश चव्हाण सामाजिक कार्यकर्ते(घाणेगांव तांडा),गणेश खैरे, ज्ञानेश्वर रामभाऊ वारंगणे आदींसह पुजारी मंडळी, भाविक भक्त, गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 9 4 5 4 4
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *