सोयगाव श्रावणबाळ, वृद्धापकाळ, संजय गांधी निराधार योजेनेचे पात्र लाभार्थीची दिवाळी गोड

Khozmaster
2 Min Read

तहसीलदार रमेश जसवंत सोयगाव यांची माहितीसोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपुत सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरातील संजय गांधी, श्रावणबाळ, वृद्धापकाळ, विधवा महिला, अपंग व परित्याक्त्या आदी योजनेचे पात्र लाभार्थ्यांची तीन हजार रुपये टाकून तहसीलदार रमेश जसवंत सोयगाव यांनी दिवाळी गोड केली असून वाटप हि आजच करण्यात आली आहे.संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ, विधवा, अपंग व परित्याक्त्या आदी योजनांमार्फत सरकारी पातळीवर गोरगरीब व गरजूंना एक हजाराचे दरमहा वेतन दिले जाते. मात्र या विविध योजनांचे अनुदान सरकारी पातळीवरून दोन महिन्यापासून न आल्याने तालुक्यातील या सर्व या योजनामार्फत सुमारे १२ हजाराहून अधिक गरजू लाभार्थी वंचीत होते परंतु दिवाळी पाच दिवशावर येऊन टेकल्याने तहसीलदार रमेश जसवंत यांनी तात्काळ योजेनेचे लाभार्थी यांची दिवाळी गोड केली आहे. आणि लगेच आजपासून वाटप सुरू करण्यात आले आहे. अशे आदेश शुद्धा मा.तहसीलदार रमेश जसवंत सोयगाव यांनी बँकांना दिले आहे.सदरील आदेशाचे अमंलबजावणी त्वरित करून काही लाभार्थ्यांना मध्यवर्ती सहकार बँकेचे कर्मचारी नामदेव चव्हाण, रोकडेसाहब,रत्नाकर उमरे तात्काळ वाटप सुरू करण्यात आली आहे.सोयगाव तालुक्यात सर्वाधिक लाभार्थी बारा हजार तालुक्यात आहेत. या योजनाखाली गरजूंना प्रत्येकी प्रती महिना एक हजार रूपये प्रमाणे तीन महिन्यांचे तीन त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.आता संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ, विधवा, अपंग परित्यक्ता या योजनेमार्फत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना गेली अनेक वर्षापासून एक हजार रूपये प्रत्येक महिन्याकाठी मिळत असतात व तेही थेट त्यांच्या बँक खात्यावर आम्ही जमा करतो अशी माहिती मा.तहसीलदार रमेश जसवंत सोयगाव यांनी बोलताना सांगितले.

 

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *