आता सभापतींसाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच.. शिक्षण सभापतींसाठी अनेकजण इच्छुक!

Khozmaster
2 Min Read

देवेंद्र सिरसाट.नागपूर . अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीनंतर आता समित्यांच्या सभापतीसाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच लागली आहे. ४ समिती सभापतीसाठी डजनभर इच्छुक आहे. त्यातही एक सभापतीपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे. त्यामुळे ३ सभापतीसाठी काँग्रेस आणि सहकाही पक्षाचे उमेदवार नेत्यांकडे लॉबिंग लावित आहे. खरं तर सदस्यांची नाराजी स्वाभाविकच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्याला आरक्षणामुळे पुढच्या टर्ममध्ये आपले सर्कल राहते की नाही याची शाश्वती नसते. ५० टक्के महिला आरक्षण, त्यातही जातीचे आरक्षण यामुळे ९० टक्के जिल्हा परिषदेचे सदस्य पुढच्या टर्ममध्ये दिसत नाही. त्यामुळे पहिल्याच टर्ममध्ये मोठा पदभार मिळावा अशी सदस्यांची इच्छा असते. सत्ताधारी सदस्य त्यासाठी जोरकस प्रयत्न करतात. ५ वर्षाच्या कार्यकाळात १२ सदस्यांना शासनाचे वाहन व स्वतंत्र कक्ष मिळते. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने नेत्यांची चांगलीच कसरत होते. त्यातही नेत्यांचे गट असेल तर हा आपला तो सावत्र अशीच स्थिती असते. जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य शांता कुमरे, नाना कंभाले, अरुण हटवार यांची याच कारणांनी उपेक्षा झाली. चेहरे नवे असले तरी नेत्यांच्या जवळचे असल्याने त्यांना संधी मिळाली. त्यामुळे पहिल्यांदाच निवडून आलेल्यांची अपेक्षा वाढली. अध्यक्ष व उपाध्यक्ष गेल्यानंतर आता सभापतींसाठी इच्छुक असलेल्या सदस्यांमध्ये दुधाराम सव्वालाखे, अवंतिका लेकुरवाळे, प्रकाश खापरे, अरुण हटवार, संजय जगताप, दिनेश ढोले, मिलींद सूटे, सुनिता ठाकरे, ममता धोपटे, सुनिता ठाकरे अशी यादी आहे. अशात काँग्रेसला समर्थन दिलेल्या राजकीय पक्षाचे सदस्यही अपेक्षा धरून आहे.इच्छुकांची यादी मोठी आहे. त्यात पुढच्या अडीच वर्षात लोकसभा, विधानसभा, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहे. त्या डोळ्यापुढे ठेवून सभापतीपदी उमेदवार निश्चित करायचा आहे. त्यातच नेत्यांचे गटही सांभाळायचे आहे. सदस्यांची नाराजी पुढे नेत्यांच्या निवडणुकीत अडचणीची ठरू नये ही देखील भिती आहे. त्यामुळे नेत्यांच चांगलीच कसरत होणार आहे.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *