सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरातील शेतकऱ्यांना पाऊसाने सळो की पळो करून सोडले आहे. पाऊस हा शेतकऱ्यांना पोट पण भरु देत नाही आणि भीक पण मागू देत नाही अशी परिस्थिती सोयगाव तालुक्यात झाली आहे.गेली आठ दिवस झाले पडत आसलेल्या अति पावसामुळे खरीपातील शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिराऊन घेतला आहे. त्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने व विमा कंपनीने सरसकट मदत देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी प्रा.जीवन कोलते(सामाजिक कार्यकर्ते)यांनी सोयगाव तहसीलदार रमेश जसवंत यांच्या कडे केली आहे.सविस्तर वृत्त असे की औरंगाबाद जिल्ह्यासह सोयगाव मतदार संघामध्ये गेले आठ ते दहा दिवस झाले पडत असलेल्या संतधार अति पावसामुळे शेतकऱ्यांचे काढणीस आलेले सोयाबीन, मुग, उडीद,कापुस, मका, बाजरी आदी पिकांची माती झाली आसुन या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी बँकेचे व खाजगी सावकाराचे कर्ज काढून महागा मोलाईचे औषध खतबी बियाणांचा आफाट खर्च करून पीक जोमात आणले होते. परंतु गेले आठ दिवस झाले पाऊस पडत असलेल्या संतधार अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे. आईन दिवाळीमध्ये शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले असुन शेतकर्यांच्या डोळ्यात अक्षरशा पाणी आलं आहे. शासनाने व विमा कंपनीने शेतकऱ्यांना सरसकट मदत करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी आशी मा.तहसीलदार रमेश जसवंत सोयगाव याच्याकडे प्रा.जीवन कोलते सामाजिक कार्यकर्ते सावळदबारा यांनी केली आहे.
Users Today : 39