महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा-2022 परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी,प्रा. भरत चव्हाण;नंदुरबार-महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट- क संयुक्त पूर्व परीक्षा-2022 शनिवार दि. 5 नोव्हेंबर, 2022 रोजी नंदुरबार येथे घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे.

शहरातील श्रीमती एच.जी. श्रॉफ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, मोठा मारुती मंदिराजवळ, नंदुरबार, जी.टी.पाटील महाविद्यालय,आय.टी.आय.जवळ, शनि मंदिर रोड, नंदुरबार, दुर्गाबाई रघुवंशी हायस्कुल, मुख्य पोस्ट कार्यालय जवळ, अंधारे स्टॉप,नंदुरबार अशा 3 उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात शनिवार 5 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत परिक्षेसाठी संबंधीत नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस प्रवेशास बंदी असेल. सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक वापरासाठी या कालावधी मनाई असेल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

0 9 4 5 4 3
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *