दिनोडा मरोडा परिसरात खरीप पिकाची,परिस्थीती चिंताजनक .
विनोद वसु अकोट तालुका प्रतिनिधी
खार पण पट्ट्यात येणाऱ्या ग्रामदिनोडा मरोडा परिसरात यावर्षी सतत धार पावसामुळे खरीप पिकाची परिस्थिती चिंताजनक असल्याचे चित्र दिसून येत आहे मरोडा येथील शेतकऱ्यांनी तर मुगाच्या झाडाला शेंगाच नसल्याने शेतात ट्रॅक्टर फिरून उभे पीक नष्ट केले परिसरात गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांच्या हातात मुगाचे पीक येत नसल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी सुरुवात पासूनच सतत धार पाऊस सुरूझाला पिके लहान अवस्थेत असल्यामुळे काही ठिकाणची पिके जडली तर काही ठिकाणी झाडाची वाढखुटली मुगाच्या झाडाला फुलोर नसल्यामुळे झाडाला शे्गा नसल्यामुळे शेतक-यानी शेतात टँक्टर फिरऊन ऊभे पिकनष्ट केले मरोडा येथील सर्वच शेतकऱ्यांनी मुगाचे पीक मोडले गेल्या आठ दिवसापासून पावसाने उघड दिल्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाची धावपळ सुरू आहे दिनोडा मरोडा गावात बाहेरगावरूनमजुर वर्ग कामकरण्यासाठी येत आहेत दिनोडा गावात 1 तासाला 60 रू मजुरीचा दर मिळत आहे मजुर10 तास काम करत असल्यामुळे एका दिवसाला 600 रू मजुरी मिळत आहे या वषीँ शेतक-याचा खर्च जास्त आणी ऊत्पन कमीअशी परिस्थीती दिसत आहे तरी शाषनाने श़ेतक-याना पिकाचे नुकसानाची तसेस खरीप पिकाला सरसगट मदत द्यावी अशी मागणी होत आहे
Users Today : 9