वसुबारस ..

Khozmaster
1 Min Read

वसुबारस ..

 

रस्तोरस्ती फिरते ती

बिचारी भाकड गाय

अन्न अन्न होई दशा

रे कुडा कचरा खाय

 

दूध दही प्यालो तिचे

खाल्ले लोणी साय

कृतघ्न आम्ही किती

सगळे विसरून जाय

 

आमची पोरे पोसली

ती फिरते बाहेर माय

उदरात जिच्या ईश्वर

प्लास्टिक तिथे जाय

 

वसुबारस सण आला

पकडून आणतो गाय

पुजेसाठी भली गर्दी

श्रध्दाळूची कमी नाय

 

चार घास खाते गाय

न् गल्ला भरला जाय

घ्या दक्षिणाअन्नधान्य 

मस्त चाले व्यवसाय

 

दुसरे दिवशी गाईच्या

नशिबी पुनश्च सराय

कामधेनु म्हणा तिला

अरे घेता कसली हाय

 

– हेमंत मुसरीफ पुणे 

  9730306996.

  www.kavyakusum.com

0 9 4 2 4 9
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *