खोजमास्टर ग्रुप ऑफ मिडिया महाराष्ट्र
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे,गडचिरोली जिल्हा पोलीस अधिक्षक अंकीत गोयल,अप्पर पोलीस अधिक्षक सोमय मुंडे ( अभियान),अप्पर पोलीस अधिक्षक समीर शेख (प्रशासन), अप्पर पोलीस अधिक्षक अनुज तारे (प्राणहिता) व जीमलगट्टा उपविभागीय पोलीस उपअधिक्षक सुजितकुमार क्षिरसागर व पोलीस दादारोला खिडकी कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली आणी संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अतिदुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासी अंध,अपंग, निराधार,कुष्ठरोगी व गरजवंत नागरिकांसाठी दरवर्षी प्रमाणे दिवाळी निमित्त लहान मोठे मुलं,मुली व महिला,पुरुष यांना कपडे,फराळ,मिठाई,औषध,आकाश कंदील,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच विकलांग विद्यार्थ्यांकरीता तीन चाकी पाच सायकली सह इतर जीवनाश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आल्याने येथील नागरिकांमध्ये खूप उत्साहाचे आणी त्यांच्यामध्ये अफाट आनंद द्विगुणित करणारी परिस्थिती निर्माण झाली होती.
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेने आदिवासी गरजवंतांकरीता मदतीसाठी केलेल्या जाहिर आव्हानाला प्रतिसाद दिला त्यामुळे लोकांना लागणारे अती आवश्यक साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले होते.ते साहित्य घेऊन संस्कार प्रतिष्ठानची टिम दि.१७ आक्टोंबर ला बाबा आमटे यांच्या वरोरा येथील ग्राम आनंदवन येथे पोहोचली.त्यांनी तिथे विकास आमटे यांची भेट घेत अंध अपंग मुकबधीर निराधार कुष्ठरोगी व शालेय विद्यार्थ्यांना मदत म्हणून कपडे,साड्या,साखर,दिवाळी फराळ,रवा,मैदा,तांदूळ,तूरडाळ, बिस्कीट पुडे,खाद्य तेल व औषधी सुपुर्त केल्या, तेथील रूग्णालयात उपचार घेत असलेल्या कुष्ठरोगी पुरूष व महिलांना कार्यकत्यांनी स्वतः त्यांच्या जवळ जावून कपडे व साड्यांचे वाटप करण्यात आले.
दि.१८ ऑक्टोंबर हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या रूग्णालयाकरीता त्यांना आवश्यक असलेल्या औषधीं दिल्या, तेथील विद्यार्थ्यांना व महिलांना ही जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर वाटप करून धुणीभांडी करणा-या महिलांनी गोळा केलेली आर्थिक मदत भेट देण्यात आली.
दि.१९ आक्टोंबर ला राबविण्यात आलेल्या या समाजोपयोगी सामाजिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीमलगट्टाचे पोलीस उपअधिक्षक अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर हे होते.प्रमुख अतिथी मध्ये संस्कार प्रतिष्ठान महा.राज्यचे अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड,जीमलगट्टा वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता मेडी,बॅंक मॅनेजर व्यंकटेश भंडारी,प्रभारी अधिकारी देवानंद वाघमारे तर सन्माननीय मान्यवर म्हणून संस्कार प्रतिष्ठानचे सुधाकर खुडे,मिनाक्षी मेरूकर,दिपिका क्षिरसागर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास तीन हजार आदिवासी बांधवांना यावेळी मदत देण्यात आली.आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांतून आलेल्या तीन हजार आदिवासी बांधवांसाठी गडचिरोली पोलीस दलाकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय मनोगतात सुजितकुमार क्षिरसागर यांनी पिंपरी चिंचवड करांनी गरजवंतांकरीता केलेल्या अनमोल सहकार्यासाठी संस्कार प्रतिष्ठानचे खूप कौतुक करून सर्वांना शाबासकीची थाप दिली तसेच या उपक्रमात सहभागी कार्यकर्त्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
या भागातील नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी जीमलगट्टा शासकीय आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले.
हा भाग नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील असल्याने या कार्यक्रमात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शस्त्रधारी विविध तुकड्या सुरक्षेसाठी या परिसरात तैनात करण्यात आल्या होत्या.
दि.१५ आक्टोंबर संध्याकाळी ५:०० वाजता गडचिरोलीत साहित्य घेऊन येणा-या गाडीचे पुजन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी करून त्या गाडीला हिरवा झेंडा दाखवला होता.
याच भागातील देचली पेठा हद्दीतील शिंदा टोला येथील आदिवासी बांधवांनी पारंपारिक असलेले आदिवासी रेला नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक प्रितम येरमे तर आभारप्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक पुजा गव्हाणे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जीमलगट्टा पोलीस उपनिरीक्षक देवकर,संस्कार प्रतिष्ठानचे सुधाकर खुडे,गोविंद चितोडकर,विजय ओतारी,कल्पना तळेकर,अर्पिता आसगावकर,रंजना गोराने,शैलजा पेरकर,दत्तात्रय देवकर,आनंद पुजारी, विलास सैद,वंदना ओलेकर,उर्मिला सैद,वैशाली खुडे,सुहास पाटील, डॉ.स्वराली खुडे,निरंजन देवकर, रमाकांत गवारे,चि.श्रवण सैद सह अनेकांनी अथक परिश्रम घेतले.
अशी माहिती या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतलेले पातूर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी यावेळी दिली.