सोयगाव दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य नागरिकांना दणका, खाद्य तेलाच्या किमतीत वाढ

Khozmaster
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव,शेतकऱ्यांची दिवाळी हि फक्त दोन दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. खुसखुशीत फराळाच्या चवीद्वारे सण साजरा करण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र, सर्वसामान्यांच्या या अपेक्षेवर महागाईमुळे पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. दिवाळी फराळासाठी वापरण्यात येणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात वाढ करण्यात आली. खाद्यतेलाचे दर आठवडाभरात सरासरी १८ रुपयांनी वाढले आहेत. केंद्र सरकारने मागील काही महिन्यांत आयातशुल्कात मोठी कपात केल्यानंतरही ही दरवाढ झाली आहे. तर सर्वाधिक मागणीच्या पामतेलापेक्षा सोयाबीन तेलाची मागणी बाजारात अचानक वाढलेली दिसून येत आहे.देशात सणासुदीचे दिवस असल्याने दिवाळीमुळे मागणी किमान २५ टक्क्यांनी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत खाद्यतेलांची आवक कमी झाल्याने घाऊक बाजारात खाद्यतेलाच्या १५ किलो डब्यांच्या दरात १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली आहे. महिनाभरापूर्वी हे दर स्थिर होते. तर सूर्यफूल तेलाच्या आहे. १५ किलो डब्याच्या दरात ५०० ते ७०० रुपयांनी घट झाली होती. मात्र आता सूर्यफूल तेलाच्या डब्यामागे १५० ते २०० रुपयांनी वाढ झाली. गेल्या काही वर्षांपासून फराळाचे पदार्थ मिठाई विक्री दुकानातून खरेदी करण्याचा कल वाढला आहे. दिवाळीत खाद्यतेलांच्यामा गणीत वाढ होते. मागणीच्या तुलनेत खाद्यतेलांच्या पुरवठा कमी झाल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात खाद्यतेलांच्या दरात वाढ झाली असल्याचे निरीक्षक गुजराथी यांनी नोंदविले.घाऊक बाजारात सोयाबीनच्या १५ किलो डब्यामागे १०० रुपयांनी वाढ झाली आहे. सरकी तेलाच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाली असून शेंगदाणा तेलाचे दर स्थिर आहेत. पाम तेलाचे दरही वाढले आहेत. वनस्पती तुपाच्या दरात किलोमागे ५० रुपयांनी वाढ झाली परतीच्या पावसामुळे नुकसान परतीच्या पावसामुळे सोयाबीन, कापसासह सर्व शेतीमालाचे नुकसान झाले आहे. मराठवाडयात सोयाबीनची लागवड मोठया प्रमाणावर केली जाते. शेतकऱ्यांचे सोयाबीनचे नुकसान झाल्याने तेलनिर्मितीवर परिणाम होणार असल्याची राज रामराज ठाकूर(सिद्धिविनायक कृषी केंद्र)देवळगाव गुजरी यांनी बोलताना सांगितले.

 

0 9 4 7 5 4
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *