सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यासह संपूर्ण सोयगाव तालुक्यात,सावळदबारा परिसरात प्रचंड पाऊस सुरू असून परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला कापूस, सोयाबीन व मका पिकाचा शेतकन्यांचा घास निसर्गाने हिरावून घेतला, पिकांचे पंचनामा न करता सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम चव्हाण देव्हारी यांनी केली. अतिवृष्टीच्या संकटामुळे शेतकऱ्यांवर दयनीय परिस्थिती ओढावली आहे शेतमालाचे मोठे नुकसान झाले मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून शेतकरी आत्महत्या करत आहे.तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. करून शेतकरी बांधवाला तात्काळ आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी उत्तम चव्हाण यांनी लावून धरली आहे. यावर्षी शेतकन्यांवर निसर्गाने संकट ओढवले आहे. विदर्भ, मराठावड्या आणि इतर भागातह अतिवृष्टी झाली, त्यात शेतकऱ्यांनी दिससरात्र राबून पिकविलेले उभे पीके वाया गेले. सोयाबीन, कपाशी, तुर, मका, बाजारी इत्यादी पिकांचं •अतोनात नुकसान झाले आहे. फळबागा व पालेभाज्या याचेही मोठ्या प्रमाणावर या पावसाचा नुकसान झाले आहे. जोडधंदा असणान्या पशुधनालाही याचा फटका बसला आहे. शेतकरी वर्गापुढे मोठं संकट उभं राहिलं आहे. खरीप हंगामात काहीतरी पदरात पडेल अशी आशा शेतकऱ्याला होती परंतु परतीच्या पावसाने सोयाबीन, कपाशी, तुर, मक्का, बाजरी इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची उरली सुरली स्वप्नही धुळीस मिसळली आहे. सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. पंचनामे न करता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करुन, तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी व शेतकरी बांधवांची दिवाळी गोड करावी अशी मागणी तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम चव्हाण देव्हारी ता सोयगाव यांनी तहसील कार्यालयात निवेदना द्वारे केली आहे.
Users Today : 43