सोयगाव परराज्यातील मालाने पारंपरिक कुंभार अडचणीत

Khozmaster
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव शहरात व सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात नादांतांडा, देव्हारी, बनोटी, जरंडी, फर्दापूर, जामठी,घाणेगांव, सावळदबारासह ग्रामीण भागातील मातीची विविध भांडी तयार करणारा पारंपरिक कुंभार समाज हा परराज्यातून येणाऱ्या मालामुळे संकटात सापडला आहे .त्याला डोक्यावर किंवा मोटारसायकल वरुन माल विकवा लागत आहे तरी पण कोणी घ्यायला तयार नाहीत.या ठिकाणी तयार होणाऱ्या भांड्यांसाठी मेहनत जास्त करावी लागते अन् कमाईमात्र कमी होते. विविध भांडी होलसेल बाजारात नेऊन विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची चांगलीच चांदी होत आहे.सोयगाव तालुक्यात सावळदबारा शंकर सुखदेव काळे कुंभार गावात कुंभारगल्लीत सध्या कुंभार समाजाची घरे आहेत . सध्या त्यांची चौथी पिढी मातीच्या विविध वस्तू बनवून विक्री करण्याचा पारंपरिक व्यवसाय करत आहे . या ठिकाणी घरासमोरच दिवाळीसाठी पणत्या , घोडे , लहान मटकी व इतर ऑर्डरनुसार भांडी बनविण्याचे काम जोमाने सुरू आहे . त्याशिवाय ही कुटुंबे विविध प्रकारचे माठ , रांजण , तांबे , सुरई , जेवणाची हंडी व हॉटेलपासून घरापर्यंत लागणाऱ्या चुली बनवितात . तसेच गणेशोत्सवात गणरायाच्या तर नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्ती देखील तयार करतात . या कामावरच कारागिरांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो . पूर्वी मातीपासून तयार होणाऱ्या विविध वस्तूंना मोठी मागणी होती . त्यामुळे कमाई देखील बऱ्यापैकी होत होती . त्याबरोबरच होलसेल बाजारात आसपासच्या जिल्ह्यांतील व्यापारी मोठ्या प्रमाणावर माल नेत होते.परराज्यातील मालाचा फटका : परिसरात गेल्या काही वर्षांपासून परराज्यातील व्यापारी माल आणून विकतात . हा माल बिहार व इतर राज्यातून येतो . तेथील माती भांडी बनविण्यासाठी चांगली असल्याने ही भांडी लोकांचे लक्ष वेधून घेतात . त्यामुळे पारंपरिक कारागीर अडचणीत आले आहेत . त्यांच्या उत्पन्नातही मोठी घट झाली आहे . उलट जे व्यापारी पारंपरिक कारागिरांकडून तयार झालेला माल विकत घेतात त्यांना बाजारात त्या वस्तू विकून दुप्पट नफा मिळतो.पर राज्यातील मालाने आमच्या व्यवसायाला जणू खिळ बसवली आहे.कोरोनामुळे आधिच आमचा व्यवसाय ठप्प झालेला आहे. गणेशोत्सव, गौरी पूजन सह अन्य उत्सव फेल झाले आहे. दिवाळीतही काय होते या चिंतेने मन व्याकूळ होत आहे.

शंकर सुखदेव कुंभार काळे,सावळदबारा ता सोयगाव

0 9 4 7 5 4
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *