प्रा.जीवन कोलते यांची तहसीलदार रमेश जसवंतसिंह यांच्याकडे मागणी सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव शहरात व सोयगाव तालुक्यात आणि सावळदबारा परिसरात : शासनाकडून रेशनकार्ड धारकांना शंभर रुपयात दिवाळीचे अन्न धान्य देण्याचे ठरले असून औरंगाबाद जिल्ह्यातील व सोयगावच्या शहरातील रेशनकार्ड धारकांना दिवाळी ३ दिवसांवर येवुन सुद्धा अजूनपर्यंत धान्य वाटप झालेले नाही. तसेच सोयगाव शहरातील अनेक रेशन दुकानात शासनाच्या नियमाप्रमाणे महिन्यातून २ वेळेस अन्न, धान्याचा लाभ मिळावा असे नियम असताना सुद्धा शहर वासियांना फक्त महिन्यातून एकाच वेळेचे धान्य मिळालेले आहे. तर काही ठिकाणी अजूनपर्यंत गरीब रेशनकार्ड धारकांना धान्याचा पुरवठा झालेला नाही. तरी पुरवठा अधिकारी व तहसीलदार रमेश जसवंत सोयगाव यांनी याची दखल घेवुन तात्काळ दिवाळीपूर्व सोयगाव वासियांना व धान्याचा पुरवठा करावा तसेच समाज कल्याण मार्फत मिळणाऱ्या दिव्यांग अनुदानाचा लाभ दिवाळीपूर्व मिळावा कारण सोयगाव शहरातील दिव्यांग लाभाथ्र्यांना ३ महिन्यापासून लाभ मिळालेला नाही. तरी याची दखल घेवून त्यांना तात्काळ लाभ मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी प्रा.जीवन कोलते (सामाजिक कार्यकर्ते) सावळदबारा ता सोयगाव यांनी मा.तहसीलदार रमेश जसवंत यांच्याकडे केलेली आहे
Users Today : 43