आमदाबाद येथे अंत्यविधी नंतर नदीला पूर आल्याने मृतदेहाची झाली हेळसांड

Khozmaster
1 Min Read

औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अंत्यविधीनंतर नदीला पूर आल्याने मृतदेहाची झाली हेळसांड कन्नड तालुक्यातील अमदाबाद गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी झाल्यानंतर मुतदेहाची झालेली हेळसांड पाहायला मिळाली आहे.कन्नड तालुक्यातील नाचनवेलजवळ आमदाबाद येथील रहिवासी शांताबाई गोटीराम बनकर यांचे मंगळवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी अंजना नदीच्या पात्रात मृतदेहाला अग्निडाग दिला.परंतु या दरम्यान पिशोर परिसरात एक तास जोरदार पाऊस झाल्याने नदीच्या पात्रात पाणी प्रचंड वाढले आणि चितेला पाण्याचा वेढा पडला.. मृतदेह अर्धवट जळत असल्याचे पाहून नागरिकांनी टायर आणून कसे बसे अंत्यसंस्कार उरकले..वारंवार मागणी केल्यानंतर ही गावात स्मशानभूमी बांधण्यात येत नसल्याने प्रेताची हेळसांड होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी यावेळी दिली.

0 9 4 7 5 4
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *