नव धन्वंतरी ..

Khozmaster
1 Min Read

नव धन्वंतरी ..

 

समुद्र मंथनी उत्पत्ती

देवांचा वैद्य धन्वंतरी 

आरोग्य देई सकळा

अमृतकुंभ तया करी

 

रूप घेवून डाॅक्टरांचे 

देवदूत येई धरतीवरी

धन तेरस निमीत्ताने 

जयंती करू साजरी 

 

संकट नवे जगावरी

कोरोनाची महा मारी 

रूपनवीन डाॅक्टरांचे 

जाणवले ते परोपरी

 

परिश्रमे तया केवळ

दिवाळी हो घरो घरी 

उपकार मानू किती 

आरोग्य देई खरोखरी 

 

नाम घेऊनि धन्वंतरी 

दीप एक लाऊ दारी

सर्वे संतु : निरामय :

रात्र नको ती अंधारी

 

आरोग्य जागृती यावी

प्रकाश उजळो अंतरी

सुख समृद्धीची खात्री

निरंतर देई धन्वंतरी

 

– हेमंत मुसरीफ पुणे

  9730306996

 www.kavyakusum.com

0 9 4 2 4 9
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *