दुधड,लाडसावंगी,शेकटा परिसरात कृषी मंत्री अबदुल सत्तार बांधावर केली पाहणी

Khozmaster
1 Min Read

औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूतऔरंगाबाद जिल्ह्यातील दुधड, लाडसावंगी व शेकटा परिसरात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दि.२१/१०/२२ रोजी शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. पंचनामा करीत असतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून शेतकऱ्यांनी धीर धरावा , राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुनराव गाढे,जि.प.सदस्य गोपीचंद जाधव, यांच्यासह महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाचे अधिकारी कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांची उपस्थिती होती.अशी माहिती जि.प.सदस्य गोपीचंद जाधव यांनी बोलताना सांगितले.

0 9 4 7 5 4
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *