देऊळगाव घुबे येथे शेतकरी संघटनेचे नेते स्व.शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन

Khozmaster
2 Min Read
चिखली | मेघा जाधव
[*प्रशिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव ढख यांच्या सह शेतकरी संघटनेचे नेते करणार मार्गदर्शन*] (फोटो)
देऊळगाव घुबे ता.चिखली :- शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा शेतकऱ्यांच्या जिवनात आपल्या अभ्यासपुर्ण मांडणीने आमुलाग्र बदल करणारे व शेतकऱ्यांचे पंचप्राण स्व.शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त देऊळगाव घुबे ता.चिखली येथील शेतकरी नेते तथा चिखली पंचायत समितीचे माजी उपसभापती भानुदास घुबे यांच्या पुढाकाराने जिल्हा स्थरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन त्यामध्ये प्रशिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव ढख यांच्या सह वरिष्ठ शेतकरी संघटनेचे नेते मार्गदर्शन करणार आहे.
     सदर मेळाव्याचे अध्यक्ष स्थान मुळे अण्णा सोशल फाउंडेशनचे प्रवर्तक रमेश अण्णा मुळे हे स्विकारणार असुन प्रमुख उपस्थिती मध्ये स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर,स्व.शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव वडले,विदर्भ जनआंदोलन समितीचे वाशीम जिल्हा अध्यक्ष डॉ.विठ्ठल घाडगे, शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान कनखर,जिल्हा अध्यक्ष देविदास पाटील,स्वातंत्र्य भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेशसींग चव्हाण,एकनाथ पाटील सुट्टे, डॉ.वामनराव जाधव,नामदेवराव जाधव शेतकरी संघटनेचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष रणजित डोसे,महीला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखाताई खांडेभराड,माजी जिल्हाध्यक्ष बाबुराव नरोटे,युवा आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.विनायक वाघ,चिखली पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ.उषाताई थुट्टे,शीवप्रसाद सारडा,शेगाव तालुकाध्यक्ष डीगांबर चिंचोले, देऊळगाव राजा तालुका प्रमुख तेजराव मुंढे या मेळाव्याला उपस्थित राहुन उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे.
 व मेळाव्यानिमीत्त सकाळी 11ते दुपारी 1 वाजेपर्यंत मीरवणुक व कला पथकाचा कार्यक्रम होणार असून दुपारी 1 वाजता जाहीर सभेला सुरवात होणार असुन जाहीर सभेनंतर देऊळगाव घुबे ग्रामस्थांनी स्नेसभोजनाचे आयोजन केले आहे तरी या शेतकरी मेळाव्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहुन प्रशिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव ढख यांच्या महत्त्वपूर्ण मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान शेतकरी संघटनेचे नेते भानुदास पाटील घुबे यांनी केले आहे.
0 9 4 5 4 4
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *