प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात शिंदे- फडणवीस : सरकारने दिवाळीपूर्वी गोरगरिब शिधापत्रिकाधारकांना दिवाळी कीट देण्याच्या घोषणेची औरंगाबाद जिल्ह्यात केली होती.दिवाळी तोंडावर आलेली असतांनाही अंमलबजावणी झाली नाही, शिधापत्रिकाधारकांना दिवाळी कीट तातडीने वाटप करून गोरगरिबांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी प्रा.जीवन कोलते(सामाजिक कार्यकर्ते)यांनी केली आहे.यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जीवन कोलते यांनी म्हटले आहे की, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत प्राधान्य कुटुंब योजना, अंत्योदय अन्न योजना व एपीएल योजनाधील शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त दिवाळी कीट देण्याची घोषणा शिंदे – फडणवीस सरकारने केली आहे. दिवाळी तोंडावर आलेली असतांना सोयगाव शहरात व तालुक्यात कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातदिवाळी कीट आले नसल्याचे निदर्शनास आले आहे. दिवाळी कीट वाटप करून गोरगरिबांची दिवाळी गोड करण्याची सरकारची घोषणा फसवी निघाली असल्याची टीका प्रा.जीवन कोलते(सामाजिक कार्यकर्ते) यांनी केली आहे. दिवाळीच्या सुट्टीत तहसील कार्यालयात केवळ नियंत्रण कक्ष स्थापन करून व शिधापत्रिकाधारकांना दिवाळी कीटापासून वंचित ठेवू नका अशी विनंती मा.तहसीलदार रमेश जसवंत यांच्या कडे प्रा.जीवन कोलते यांनी केली आहे.
Users Today : 43